राज्याची स्थापना करणारे

हे अभ्यासपुस्तक राज्याची स्थापना करण्यासाठी (भाग एक) सेवकांस तयार करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या सात संदेशांचा संग्रह होय. राज्याची स्थापना करीत असतांना आम्हास हे लक्षात ठेवावयाचे आहे की सर्व काही त्याच्याचपासून, त्याच्याचद्वारे व त्याच्याप्रीत्यर्थ आहे. सर्व गोष्टींत तो श्रेष्ठ आहे, प्रथम स्थानी आहे. जे काही आम्ही करतो, त्यात जर परमेश्वर सर्वश्रेष्ठ नसेल, तर जे कार्य आम्ही करीत आहोत, त्याला खिस्ताच्या राज्याची स्थापना करणे म्हणता येणार नाही. जर आम्ही सर्व सेवक राज्याची उभारणी, स्थापना करणारे म्हणून परिश्रम करू, तर खिस्ताची मंडळी खरोखर भिन्न होईल. राज्याची स्थापना करणारे बना!